shahajibapu patil esakal
महाराष्ट्र बातम्या

'जो माणूस बायकोला साधी साडी'...खडसेंच्या टीकेला शहाजीबापू पाटलांचं प्रतिउत्तर

कदाचित गंमतीने शहाजीबापूंनी ते विधान केले असेल

सकाळ डिजिटल टीम

काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल...या डॉयलॉगमुळे प्रसिद्ध झालेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान, गरिबीमुळे बायकोला साडी घ्यायला जमली नाही, असे म्हटले होते. हाच मुद्दा पकडत राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी शहाजीबापू पाटलांवर निशाणा साधला होता. शहाजीबापूंनी त्यांची पूर्वीची स्थिती सांगताना म्हटले होते की, त्यावेळी शरद पवारांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही.

बायकोलाही साडी घ्यायला पैसे नव्हते. कदाचित गंमतीने शहाजीबापूंनी ते विधान केले असेल, किंवा उद्वेगातून केले असेल. पण आपल्या बायकोलाही साडी घेऊ शकत नसेल तर तो मर्द कसला. अशी टीका एकनाथ खडसेंनी केली होती. त्याच टीकेला आज शहाजी बापू पाटीलांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले “एकनाथ खडसे यांना माझ्या मर्दांनगीचं वेड का लागले आहे, त्यांनी माझी मर्दांनगी तपासू नये. खडसेंनी त्यांच बघावं.

माझ्या पराभवाच्या काळातील घडलेलं दुःख मी माझ्या मित्राला सांगत होतो. आणि मी बोलून दाखवलं अन् ते व्हायरलं झालं. गणपतराव देशमुखांसारख्या नेत्याच्या विरोधात निवडणूक मी लढत होतो. त्यामुळे मला घराकडे, संसाराकडे लक्ष देता आलं नाही. असं उत्तर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना दिले आहे. तसेच “खडसेंवर असलेल्या आरोपांवर देखील भाष्य केलं ते म्हणाले घोटाळा करून संसार केला नाही. माझे हात पापाने भरलेले नाहीत." असा टोलाही खडसे यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी लांबणीवर, राज्यपालांच्या भेटीत काय घडलं?

Thane: ठाणे जिल्ह्यात पाणीकपातीच संकट, 'या' दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद; हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे पालिकेचा निर्णय

Nagpur Tehsildar Attack : नागपुरात तहसीलदाराला जेसीबीला लटकवलं अन्... "कायदा आता माफियांच्या दादागिरीने चालतोय का?" वडेट्टीवारांचा सवाल

Bank Closed: सलग 4 दिवस बँका बंद राहणार? SBI बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला देशव्यापी संप!

Alandi Palakhi: आळंदी देवस्थान आक्रमक भूमिकेत; पुणे मुक्कामाबाबत अंतिम निर्णय १३ मे नंतर, प्रशासन-देवस्थान समन्वयानंतर वेळापत्रक जाहीर होणार!

SCROLL FOR NEXT