Hasan Mushriff Sakal
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushriff : मुलीच्या घरात गेले, सासूला त्रास दिला; छाप्यानंतर संतापलेल्या मुश्रीफांची प्रतिक्रिया

"नवाब मलिक गेले आता मुश्रीफवर कारवाई होणार"

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर आज सकाळपासून ईडीकडून छापेमारी सुरू आहे. कथित साखर घोटाळ्याप्रकरणी हे छापे पडत आहेत. त्याबद्दल आता हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

या कारखान्याशी आपला कोणताही संबंध नाही, असं सांगत मुश्रीफांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले आहेत. किरीट सोमय्या यांनी दीड वर्षापूर्वीच आरोप केले होते आणि आपण पत्रकार परिषद घेऊन त्याची उत्तर दिल्याचंही मुश्रीफ यांनी सांगितलं. तर किरीट सोमय्यांवर बदनामीसाठी दीड कोटीची केस केल्याचंही मुश्रीफांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

आपल्या घरच्यांनाही या छापेमारीमध्ये त्रास झाल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मुश्रीफ म्हणाले, "आमचा, माझ्या कुटुंबियांचा काहीही संबंध नसताना आरोप केले जात आहे. इनकम टॅक्सकडूनही कारवाई करण्यात आली पण आता त्यावर स्थगिती देण्यात आली आहे. आता ईडी कशाबद्दल छापे मारत आहे माहित नाही. कशासाठी हे सगळं सुरू आहे?"

मुश्रीफ पुढे म्हणाले,"माझ्या मुलीच्या घरीसुद्धा छापेमारी सुरू आहे. तिच्या घरात हे गेले, सासूला त्रास दिला, घरात नातवंडंही होती. पोलिस त्यांना घाबरवत आहेत. कारवाई करायची आहे तर आम्हाला समन्स द्या, चौकशीसाठी बोलवा. पण मुलाबाळांना त्रास का देता? सत्ता आल्यावरही तुम्ही थांबत नाही. चार वर्षांपूर्वीही छापा पडला होता. तेव्हाही इनकम टॅक्सने माझ्या मुलाबाळांना बोलावलं होतं."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT