Devendra Fadanvis vs Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: 'तुम्हाला फौजदारचा हवालदार केला, तुम्ही आमची माप काढावी?' जयंत पाटलांचं फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निपाणीमध्ये जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर केला होता हल्लाबोल

अंकिता खाणे (Ankita Khane)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निपाणीमध्ये जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे, कर्नाटकात काय डोंबल करणार? हे पार्सल महाराष्ट्रात पाठवा त्याचे काय करायचे ते पाहतो, असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या या व्यक्तव्याला निपाणीमध्येच उत्तर देणार असं शरद पवार म्हणाले होते. अशातच या टीकेवर जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

फडणवीसांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने निपाणीमध्येच जाहीर सभा घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या शैलीमध्ये फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. जयंत पाटील पुढे म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला आहे आणि तुम्ही आमची मापं काढावी का? असं पाटील म्हणालेत.

तर शरद पवार यांच्या झंझावातात 2024 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होणार असल्याचे जयंत पाटील म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की कर्नाटकात जाऊन शेतकऱ्यांचे, तरुणांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीत उतरायचं असं ते म्हणालेत.

या देशात हुकूमशाही वाढत चालली आहे. विरोधात बोलणाऱ्यांना गप्प बसवण्याचं काम सध्या सुरू आहे. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार यावं अशी आमची इच्छ आहे. आमचे चार ते पाच आमदार निवडून येतील. यावर्षी कर्नाटक राज्यात भाजप सरकार येणार नाही असं ते म्हणाले आहेत.

अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर

आम्ही साडे तीन जिल्ह्यातले आहोत. तर, त्यांनी आमच्या नेत्यांबाबत चिंता करता कामा नये. भाजपचे नेते राष्ट्रवादी नेहमी आमच्या बद्दल बोलत असतात. शिवसेना फोडली आणि काँग्रेसबद्दलही तसाच प्रचार भाजपकडून करण्यात येतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलचे पहिले कसोटी शतक! रवींद्र जडेजासह मिळून वेस्ट इंडिजचा 'गेम' केला, रिषभची वाढवली धडधड

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

"मुंज्या सिनेमा मराठीत बनणार होता पण.." दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा ; म्हणाला...

Heavy Rain Damages Mosambi: कन्नड तालुक्यात मोसंबी बागांना अतिवृष्टीचा फटका; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

Heavy Rain: लाखाोंचे मासे गिरिजा नदीत गेले वाहून; फुलंब्रीतील मागासवर्गीय मत्स्य व्यावसायिक संस्था संकटात

SCROLL FOR NEXT