Eknath Shinde Fadanvis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Ptil: शिंदेगटाला सोबत घेतल्यामुळे भाजपचं रेटिंग घसरलंय! राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य

भाजपला राज्यातली जनताच त्यांची जागा दाखवेल

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सत्तांतर झालं आणि सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित येत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष केलं आहे. शिवसेना आणि भाजप युतीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने भाष्य केलं आहे.

“शिंदेगटाला सोबत घेतल्यामुळे भाजपचं रेटिंग घसरलंय”, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपला राज्यातली जनताच त्यांची जागा दाखवेल. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदेगटाला आणि उद्धव ठाकरेंना जनतेचा किती पाठिंबा आहे हे मालेगावच्या सभेत दिसून आलं असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.

शिंदे गट भाजपसोबत गेल्यामुळे शिंदे गटाचं तर रेटिंग कमीच आहे. पण असंगाशी संग केल्यामुळे भाजपचं पण रेटिंग लोकप्रियता घसरली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

काय म्हणालेत जयंत पाटील?

शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदेगटाला आणि उद्धव ठाकरेंना जनतेचा किती पाठिंबा आहे हे मालेगावच्या सभेत दिसून आलं. शिंदे गटाचं रेटिंग घसरलेल होतं. परंतु आता शिंदेगटाला सोबत घेतल्यामुळे भाजपचं रेटिंग घसरलंय. भाजपला राज्यातली जनताच त्यांची जागा दाखवेल. भाजपची लोकप्रियता कमी झाली आहे. पण असंगाशी संग केल्यामुळे भाजपचं पण रेटिंग लोकप्रियता घसरली आहे, त्याचा अनुभव भाजपा घेत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT