Sharad Pawar Resigns
Sharad Pawar Resigns  Esakal
महाराष्ट्र

Jayant Patil: बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी झाली 'या' नावाची चर्चा; जयंत पाटलांनी सांगितलं नाव

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याचं जाहीर केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली असून नवीन अध्यक्ष कोण होणार याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण, आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे. आजच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीची आज सकाळी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी सगळेच नेते हजर होते. पवार यांनी समिती नेमली आहे त्या समितीची ही बैठक होती. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तर पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, 'पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे देशात राष्ट्रवादी पक्ष वाढला आहे. देशभरात कार्यकर्ते हे त्यांच्या नावामुळे जोडले गेले आहेत'.

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार येणार नाही. आम्ही आज सांगतोय, त्यांनी ही निर्णय बदलावा. आमचा पहिला प्रयत्न आहे की, पवार साहेबांनी अध्यक्ष राहावं, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनीच राहावं अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचंही पुढे पाटील म्हणाले आहेत.

तर पुढे जयंत पाटील म्हणाले की, 'आम्ही सगळे एकत्र आहोत, कुणाचं नेतृत्व मान्य करू नये, असं काही नाही. पवार साहेबांनी अध्यक्षपदी राहावं अशी सर्वांचीच मागणी आहे. देशभरात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी आणि चर्चेसाठी शरद पवार साहेबांची गरज आहे, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT