ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांना मविआमध्ये उपमुख्यमंत्रिपद का दिलं? जयंत पाटील म्हणाले...

सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात असंही जयंत पाटील म्हणालेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात 2019 च्या निवडणूक निकालानंतर मोठी राजकीय घडामोडी घडल्या. भाजपा-शिवसेना युतीला जनतेने बहुमत दिलं. परंतु मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षाने वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. त्यानंतर काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं.

अशातच अचानक पहाटे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी सोहळा केला त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी कुणाच्या सांगण्यावरून केला? की अजितदादा यांनी स्वत: हा निर्णय घेतला.

देवेंद्र फडणवीसांसोबत गेले याबाबत अनेक प्रश्न आजही कायम आहेत. मात्र अजित पवार यांनी ७२ तासांच्या सरकारमधून बाहेर पडत पुन्हा महाविकास आघाडीत परतले आणि त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळालं हे का याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

याबाबत जयंत पाटील म्हणाले की, पहाटेचा शपथविधी मी टीव्हीवर पाहिला. उद्धव ठाकरेंनी मला फोन केला तेव्हा मी झोपेमध्ये होतो. राजकारणात काही गोष्टी होत असतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात. अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहे. काम करण्याचा अनुभव आहे. ते आक्रमक आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाला त्यांची गरज आहे. ते पुन्हा पक्षात आले तेव्हा सगळ्यांनी बसून सर्व समस्यांचे निरसन केले होते. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं असं त्यांनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर अजित पवार यांनी असं का केले हे सांगण्याची गरज नाही. आम्ही सर्व एकत्रित बसलो. पवारसाहेबांनी तो निर्णय घेतला. आमच्या सगळ्यांच्या वतीने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. काही प्रश्नांची उत्तरे शोधायची नाहीत असंही जयंत पाटील म्हणाले. तर पुढे ते म्हणाले कि, पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा मलाही शॉक बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT