Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार हिंदूविरोधी; राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पत्रकावर आव्हाड म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हिंदूविरोधी असून, त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, असे पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढल्याने खळबळ उडाली आहे. या पत्रकानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत असून, जितेंद्र आव्हाड यांनी हे वारकरी परिषदवाले कोण आहेत याची ओळख द्यायला नको असे म्हटले आहे.

राष्ट्रीय वारकरी परिषदेने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. शरद पवार हिंदूविरोधी असल्याचा राष्ट्रीय वारकरी परिषदेने गंभीर आरोप केला आहे, शरद पवारांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असे राष्ट्रीय वारकरी परिषदेने या पत्रकात म्हटले आहे. पवार हिंदूविरोधी असल्याचा आक्षेपही नोंदवण्यात आला आहे. 

सर्व संप्रदायाची वारकरी मंडळी पंढरपुरात आलेली असता त्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला आहे. शरद पवार हे नेहमी हिंदू धर्माला विरोध करतात. रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिकवादी मंडळींना पाठिंबा देण्याचे काम करतात. त्यामुळे शरद पवारांना यापुढे कुठल्याही कार्यक्रमाला वारकऱ्यांनी बोलावू नये, अशा आशयाचं हे पत्रक आहे. वक्ते महाराजांनी हे पत्रक काढले असून, त्यांना 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारचा ग्यानबा तुकाराम पुरस्कार मिळालेला आहे. वक्ते महाराज हे हिंदुत्ववादी संघटनांच्या जवळचे समजले जातात.

यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे, की वारकरी प्रथा परंपरा सुरु झाली ती इथल्या कर्मकांडाविरुद्ध पांडुरंग भक्तीमध्ये तल्लीन झालेले संत याचेच प्रभोधन करत होते आणि कट्टर मनुवादी त्याला विरोध. हे वारकरी परिषदवाले कोण आहेत याची ओळख द्यायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: खून, बलात्कार अन् अनेक गंभीर गुन्हे; दिल्ली आंदोलनात अडीच हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारांचा सहभाग; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Farm Loan Waiver: कर्जमाफीतील तांत्रिक अडथळे दूर करा; पात्र शेतकरी वंचित राहू नयेत, शिवसेनेची मागणी

Latest Marathi News Live Update : बारवी धरण ९१ टक्के भरलं; दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोनाली कुलकर्णीच्या भावाची लगीनघाई! भावजयीवर भारी पडली नणंद; बायकोला पाहून कुणाल जीजू म्हणतात-

Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव पिकअपची धडक, सहा मेंढ्या ठार

SCROLL FOR NEXT