NCP 
महाराष्ट्र बातम्या

'शिवसेनेने पडणारा नेता नेला; आता आम्ही राष्ट्रवादीची ताकद दाखवू'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्वतः निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु शिवसेनेने पडणारा नेता नेला आम्ही शिवसेनेच्या तीन जागा कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देवू, असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी सचिन अहिर आणि शिवसेना यांच्यावर तोफ डागली.

सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला यांचे पक्षाला आणि नेत्यांना दु:ख झाले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडून विश्वासघात होत असेल तर ती गोष्ट नक्कीच दु:ख करणारी आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. 

सचिन अहिर शिवसेनेत गेले असले तरी त्यांच्यासोबत वरळीतील एकही कार्यकर्ता गेलेला नाही हेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. पक्षाने 15 वर्ष मंत्रीपद आणि 15 वर्षे मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. परंतु मुंबईत विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असा आरोपही मलिक यांनी केला. 

सचिन अहिर शिवसेनेत गेले आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही नव्याने, ताकदीने पक्ष मुंबईत उभा करु आणि मुंबईत जास्तीत जास्त यश मिळवून देवू असा आत्मविश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Ceasefire: युद्ध थांबलं, आता फ्लाइट भाडे कमी होणार का? ऑनलाइन खरेदी स्वस्त होईल का?

सलमानच्या खानच्या 'या' अभिनेत्रीला मातृशोक; वडिलांनीही लहानपणी सोडलेली कुटूंबाची साथ

सोन्या चांदीला झळाळी ते इंधन पुरवठा सुरळीत! युद्धविरामाचा भारताला काय होणार फायदा?

IPL 2026: वैभव सूर्यवंशी भविष्यातील मुंबई इंडियन्सचा खेळाडू... RR vs MI सामन्यानंतर कोणी केला हा दावा? कसं आहे शक्य?

दीपिकाने धर्म बदलून केलेलं दुसरं लग्न; आता मुलाला नमाज शिकवत आहे अभिनेत्री, भावूक होत म्हणते....

SCROLL FOR NEXT