Sharad Pawar Prabhakar Deshmukh
Sharad Pawar Prabhakar Deshmukh esakal
महाराष्ट्र

'मी पवार साहेबांचा चेला हाय, त्यांचा आदेश घेऊनच राजकारणात आलोय'

विशाल गुंजवटे

'माझी पातळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुरस्कार देऊन ठरवलीय.'

बिजवडी (सातारा) : विरोधक जेव्हा मतदारसंघात आले तेव्हा त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपासून (Zilla Parishad Election) ते आतापर्यंत पैशांचा, गुंडगिरीचा वापर करत माणचं राजकारण नासवण्याचं काम केलेय. जनाधार कमी झाला की पैसे वापरायचे अन् निवडणुका जिंकायच्या. जिल्हा बँक निवडणुकीतही District Bank Election (कै.) सदाशिवराव पोळ यांच्या कट्टर समर्थकांना पैसे देऊन फोडण्याचे काम केले. हे लोक निर्ढावलेली आहेत. त्यांना दहिवडी, वडूज, बिजवडीसारखी इतर निवडणुकाही जागा दाखवून देणे गरजेचे असल्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी केले.

येळेवाडी (पिंपराळे) (ता. माण) येथे बिजवडी सोसायटीच्या नूतन संचालकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी मनोज पोळ, नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, तानाजी कट्टे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, सुनील पोळ, बाळासाहेब सावंत, शिवाजीराव महानवर, बाबूराव काटकर उपस्थित होते. देशमुख म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधी हे ताम्रपट घेऊन आल्यासारखे आतापर्यंतची १५ वर्षे अन् पुढचीही १५ वर्षे मीच आमदार राहीन, अशा अहंकारी वल्गना करत आहेत. रावणालाही मोठा अहंकार होता. शेवटी त्यांचे काय झाले. मी म्हणजेच सरकार, माझेच सरकार म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सरकार कोणा एकट्याच नसतं, सरकार जनतेचं असतं, हे लक्षात घ्यावं. विधानसभा निवडणुकीदरम्यान जिहे- कटापूरचे पाणी किती दिवसांत आणणार होता. कुठे गेल्या त्या वल्गना, किती दिवस लोकांना फसवताय, पाइपलाइन पूजनाच काय झालं, जादा पाण्याच रिझर्वेशन घेतलंय का, टेंभूचे पाणी इकडे का आलं नाही, सांगलीत पाणी जाताना आपण का गप्प होता याची उत्तरे द्या.

Prabhakar Deshmukh

पवार (Sharad Pawar) साहेबांवरती बोलणाऱ्यांकडे पात्रता हवी. साहेब काय करतात ते भल्याभल्यांना समजत नाही. मी साहेबांचा चेला असून, त्यांचा आदेश घेऊनच मी राजकारणात आलोय. यश-अपयश आले तरी आपण थांबणार नाही. वैयक्तिक टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा विरोधकांनीही विकासाच राजकारण करावे. एमआयडीसीचे खरे श्रेय माणचे दोन सुपुत्र एमआयडीसीचे माजी अधिकारी अविनाश सुभेदार अन मलिकनेर साहेबांना दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही एमआयडीसी कुठेही जाणार नाही. काळजी करू नका, असे सांगितले आहे.’’ फलटणकरांवर बोलणारे जिल्हा बँक निवडणुकीवेळी तिथं जाऊन का शरण आले, बँकेतून का माघार घेतली, तिथं नेमकी काय सेटलमेंट करत तोड केली, हे एकदा जाहीर करा, अशी टीकाही त्यांनी केली. एम. के. भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसलेंनी मनोगत व्यक्त केले. विजय बरकडे यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग भोसले यांनी आभार मानले.

विकासावर बोलण्यापेक्षा वैयक्तिक टीका करत लोकप्रतिनिधी माझी पातळी काढत आहेत. माझी पातळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुरस्कार देऊन ठरवलीय. दोन्हीही तुमचेच वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे तुम्ही माझी पातळी ठरवू नका. तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे नाहीत.

- प्रभाकर देशमुख, नेते, राष्ट्रवादी कॉँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT