Prajakt Tanpure 
महाराष्ट्र बातम्या

ईडीचा मोर्चा प्राजक्त तनपुरेंकडं! महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी चौकशी

गेल्या चार तासांपासून चौकशी सुरु

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडीकडून समन्स बजावले जात आहेत, यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांचाही समावेश झाला आहे. ईडीकडून तनपुरे यांची चार तास चौकशी झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी त्यांना ईडीनं समन्स बजावलं होतं. सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. आज दुपारी 12 वाजता तनपुरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर एक एक करत ईडी आपला फास आवळताना दिसतेय. अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे आणि भावना गवळींनंतर आता ईडीनं आपला मोर्चा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे वळवला आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि बेकायदेशिर व्यवहार प्रकरणांमध्ये प्रजक्त तनपुरे यांची ईडी मार्फत चौकशी केली जात आहे. हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेनं वाटलेल्या कर्जातील घोटाळ्याप्रकरणाशी संबंधीत असल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्र सहकारी बँकेनं अनेक साखर कारखान्यांना कर्ज दिली आहेत. या कर्ज वाटपात मोठा भ्रष्टाचार करण्यात आला होता. तसंच प्राजक्त तनपुरे यांनी नगरमधील राम गणेश गडकरी साखर कारखाना ज्याची मूळ किंमत 26 कोटी रुपये आहे तो 12 कोटीत विकत घेतला होता. या कारखान्यालाही महाराष्ट्र बँकेनं मोठं कर्ज दिलेलं होतं. या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची ईडीला संशय आहे. त्यासाठी प्राजक्त तनपुरे यांची कसून चौकशी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT