Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : रुग्णालय ते शिर्डी, शिर्डी ते रुग्णालय; दोन्ही हातांना पट्ट्या बांधून पवारांचा प्रवास

शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते रुग्णालयातच आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सध्या शिर्डी इथं सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील आता शिर्डीसाठी रवाना झाले आहेत. पवारांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, शिबीर संपल्यावर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होतील.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून शरद पवार यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती हाती येत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या या शिबिरासाठी शरद पवार रुग्णालयातून थेट शिर्डी येथे दाखल झाले आहेत. तिथे जाऊन ते उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. पवार आता हेलिकॉप्टरने शिर्डीकडे रवाना झाले आहेत.

हेही वाचा - एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवार थेट महालक्ष्मी रेसकोर्सकडे निघाले. तिथून हेलिकॉप्टरने त्यांनी शिर्डीकडे मार्गक्रमण केलं. यावेळी त्यांच्या दोन्ही हाताला पट्टया बांधलेल्या दिसून आल्या. यावेळी शरद पवार यांच्यासोबत डॉक्टरांची एक टीमही असेल. तिथे त्यांच्या आरोग्यवर लक्ष ठेवलं जाईल आणि त्यानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT