Supriya Sule sakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : पहिल्या नजरेत भावली पवारांची लेक, वाचा सदानंद अन् सुप्रिया सुळेंची लव्हस्टोरी

सुप्रिया सुळे यांची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मंगळवारी आपल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निवृत्तीला विरोध दर्शवला तरीसुद्धा पवार त्यांच्या निवृत्तीवरच्या घोषणेवर ठाम राहिले.

आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण? अशा चर्चा रंगल्या आहेत. यात शरद पवारांची लेक खासदार सुप्रिया सुळेंचं नाव समोर येत आहे. सुप्रिया यांचं राजकारणी आयुष्य सर्वांनाच माहिती आहे पण तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती आहे का? सुप्रिया सुळे यांची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. (ncp leader sharad pawar daughter Supriya Sule and sadanand sule love story)

शरद पवार यांची लाडकी मुलगी सुप्रिया सुळे ही तिच्या वडिलांसारखीच राजकारणात सक्रिय आहे. सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जुन १९६९ रोजी पुण्यात झाला. पुण्याच्या सेंट कोलंबस स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून बी.एस.सी. पूर्ण केली.

बी.एस.सी पुर्ण केल्यानंतर त्या पुण्यात आपल्या काकांकडे आल्या आणि त्यांनी एका वृत्तपत्रात काम करू लागल्या. ही नोकरी करताना एका जवळच्या फ्रेंडच्या पार्टीमध्ये सुप्रियाला एक व्यक्ती भेटले. या व्यक्तीचं नाव होतं सदानंद सुळे.

सदानंद सुळे हे महिंद्रा अँड महिंद्राचे माजी संचालक भालचंद्र सुळे आणि शशि भट्ट यांचा मुलगा आहे. शशि भट्ट या एक बॅडमिंटन खेळाडू राहल्या. त्या भारतीय सिविल सेवा अधिकारी एम डी भट्ट यांची मुलगी आहे.

सदानंद यांना सुप्रिया या पहिल्या नजरेतच आवडल्या. त्यांच्यात सुरवातीला मैत्री झाली आणि नंतर ते एकेमेकांच्या प्रेमात पडले. एक वेळ अशी आली की दोघांना वाटलं की लग्न करावं त्यामुळे दोघांनीही आपआपल्या घरी सांगितले आणि लग्न ठरले. अशाप्रकारे सुप्रिया यांना सदानंद सुळे यांच्या रुपात त्यांचा जीवनसाथी मिळाला.

लग्नानंतर सुप्रिया काही वर्षांसाठी अमेरिकेला गेल्या आणि त्यांनी बर्कले यूनिवर्सिटीमध्ये वॉटर पोल्यूशनला घेऊन एक रिसर्च पेपरही लिहला ज्याची नंतर भारतात खूप चर्चा झाली होती.
अमेरिकेनंतर सिंगापुर आणि जार्जियामध्ये सदानंद यांनी नोकरी केली तेव्हा सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होत्या. त्यानंतर दोघेही भारतात परतले आणि सुप्रिया राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना विजय सुळे आणि रेवती सुळे असे दोन मुलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT