Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : पवारांवर नक्की कसले उपचार सुरू आहेत? डॉक्टरांनीच सांगितलं...

डॉक्टरांनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, आजच ते शिर्डीतल्या कार्यकर्ता शिबिरासाठी रवाना झाले आहेत. तिकडून येऊन पुन्हा ते रुग्णालयात दाखल होतील. त्यांना काय झालंय हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे.

शरद पवार आज शिर्डीला कार्यकर्ता शिबिरासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टरांची एक टीमही होती. ही डॉक्टरांची टीम त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून राहतील.शरद पवार यांच्यासोबत डॉक्टर प्रतीक समदानी आणि त्यांचे काही सहकारी आहेत. शिर्डीहून परतल्यावर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे.

हेही वाचा - एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल त्यांच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, "शरद पवार पु्न्हा रुग्णालयात दाखल होतील. दोन तीन तास ते कसे राहतायत, तब्येत कशी राहतेय, त्यावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. त्यांच्यावर न्यूमोनियासाठी उपचार सुरू आहेत. त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. " तर पवार साहेब सध्या प्रकृती आणि राजकीय लढा देत आहेत. त्यांना थोडा ताप आला आहे, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT