Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : कितीही टेन्शनचा दिवस असला तरी पवार हा छंद कधीच विसरत नाहीत

आज आपण त्या छंदाविषयीच जाणून घेणार आहोत.

निकिता जंगले

Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अजित पवार ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फुट पडेल का? अशाही चर्चा रंगून आल्या.

आज माध्यमांसमोर येऊन अजित पवारांनी सर्व चर्चांना पुर्णविराम दिला. नको त्या अफवा पसरवू नका, असे आवाहन केले आणि मरेपर्यंत राष्ट्रवादीत राहणार असल्याचे ठामपणे सांगितले.

मात्र हा घटनाक्रम आणि या बातम्या वाचून शरद पवारांना स्ट्रेस किंवा टेन्शन आले असेल, असं तुम्हाला वाटेल पण तुम्हाला माहिती आहे का कितीही टेन्शनचा दिवस असला तरी पवार एक छंद कधीच विसरत नाहीत. आज आपण त्या छंदाविषयीच जाणून घेणार आहोत. (ncp leader Sharad Pawar never forget this habit although he is in stress or tension)

यासंदर्भात लोक माझे सांगाती या पुस्तकात लिहताना शरद पवार म्हणतात, "दिवसभरातल्या भेटीगाठी, दौरे, प्रवास, बैठका, जाहीर सभा यांतूनही स्वतःसाठी वेळ काढण्याचं वळण मी स्वतःला लावून घेतलं आहे. कितीही धकाधकीचा दिवस असू दे, रात्री झोपण्यापूर्वी मी काही वेळ शास्त्रीय संगीत ऐकतोच ऐकतो.

भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर आणि मालिनी राजूरकर हे माझे अतिशय आवडते गायक. त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या दौलतीचा सगळाच खजिना माझ्या संग्रही आहे."

पुढे शरद पवार हेही सांगतात, "पुस्तकं वाचणं, किवा या आवडत्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका ऐकण्याची मला सवय आहे. वाचनाच्या बाबतीत विकासविषयक साहित्य ही माझी आवड आहे. निवांत क्षण घालवण्यासाठी माझ्या मित्रांसोबत पर्यटनाला जातो. माझी पत्नी प्रतिभा आणि मी विसाव्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरायला जातो.

जिथे असेन तिथे संध्याकाळच्या वेळी स्थानिक लोकांशी गप्पा मारणं, हा माझा आणखी एक आवडीचा भाग ! वर्षातून अशा समृद्ध विरंगुळ्याच्या दिवसांमुळे जगण्याची ऊर्जा घेऊन मी परततो. पुन्हा राजकारण आणि समाजकारण सुरू होतं."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT