CM Maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

CM Maharashtra: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, हा वेडेपणा...

अजित पवार यांच्या सासरवाडीत लागले बॅनर

धनश्री ओतारी

राज्यात मुख्यमंत्री पदाच्या बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांचे धाराशिवमध्ये भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. (NCP leader Sharad Pawar On Ajit Pawar banner future cm maharashtra)

शरद पवार पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या मुख्यमंत्री बदलासंदर्भात विचारले. यावर त्यांनी स्वतः कोणतही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, या सुरु असलेल्या बॅनरबाजीवर अजित पवार त्यांना काय म्हणाले हे यावेळी शरद पवारांनी पत्रकारांना सांगितले.

'मुख्यमंत्री बदलासंदर्भात मला काही माहिती नाही आणि जे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर अजित पवारांनी सांगितले की, हा वेडेपणा आहे. ' असं शरद पवार म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. यातच अजित पवार यांची सासरवाडी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावा मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले आहेत.

शहरातील चौका चौकात तेरचे जावई ,आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. तसेच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT