NCP leader  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: बारसू रिफायनरी वादात शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना मोलाचा सल्ला

रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे.

धनश्री ओतारी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी मुद्यावरुन घमासान सुरु आहे. प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. (NCP leader Sharad Pawar On Barsu Refinery Project Maharashtra Politics)

काय म्हणाले शरद पवार?

स्थानिकांच्या भावना तीव्र असतील तर त्याची नोंद घेतली पाहिजे. लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. सामंतांकडून बारसू रिफायनरीचा आढाला घेतला. कोणताही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. उद्याच्या बैठकीत तोडगा निघतो का ते पाहू. रिफायनरी आंदोलकांचे प्रश्न सोडले पाहिजेत.


चर्चेतून मार्ग काढा असा सल्ला मी दिला आहे. बारसूतील रिफायनरी बाबत चर्चा करायला हवी. अशं पवार पत्रकार परिषदमध्ये म्हणाले.

उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करुन आढावा घेतला. यावेळी पोलीस बळाचा वापर झाल्यासंबंधीही बोलणं झालं. त्यावर त्यांनी आम्ही आता कारवाई करणार नसल्याचं म्हटलं आहे. सध्या फक्त जमिनीची तपासणी करत असून त्यासाठी लोक विरोध करत होते. पण आता त्यांचा विरोध नाही. लोकांना समजावून सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी दिली," असं शरद पवार यांनी सांगितलं.

आम्हाला हा प्रकल्प करायचा असल्याची सरकारची भूमिका आहे. पण आम्ही त्यांना घाई करु नका असं सांगितलं आहे. तेथील स्थानिक विरोधक आणि शासकीय अधिकारी यांची बैठक घ्या आणि त्यातून काय निष्पन्न होतं हे पाहूया असं म्हटलं.

त्यावर सामंत यांनी उद्याच आंदोलकांचे प्रतिनिधी आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी बैठक घेतील. त्यातून येणारा निष्कर्ष सरकारला दिला जाईल. त्यानंतर जर आणखी काही प्रश्न असतील तर त्यावर चर्चा करत मार्ग काढू किंवा काही पर्याय आहे का त्यावर बोलू असा सल्ला मी दिला," असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

शरद पवारांना प्रकल्पावर त्यांची भूमिका काय असं विचारलं असता ते म्हणाले, "मी स्थानिकांशी चर्चा केलेली नाही. कोणताही प्रकल्प करताना स्थानिकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं. त्यांचा विरोध असेल तर ते समजून घेत त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. कोकणात काही नवीन होत असेल आणि स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे'. दरम्यान माझ्या पक्षाचे काही सहकारी तिथे जाणार आहेत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT