NCP leader Sharad Pawar thanks to sunil Shukre for vegetables 
महाराष्ट्र बातम्या

कोण सुनील सुक्रे? ज्याचे पवारांनी मानले आभार !

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सुनील सुक्रे नामक व्यक्तीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आभार मानले आहेत. आता सुनील सुक्रे कोण हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. शरद पवार यांनी या व्यक्तीविषयी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून माहिती दिली आहे. सुनील सुक्रे ह्या शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या शेतकऱ्याने २०० किलोमीटर दुचाकीने प्रवास करून मला मुंबईत पवारांना भाजीपाला आणून दिला असल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल त्यांनी त्याचे आभारही मानले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पवार पुढे म्हणाले आहेत की, अशा काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रेम हीच माझी शक्ती आहे. पवार यांचे वय आणि त्यांची काम करण्याची शैली हा नेहमीच माध्यमांच्या चर्चेचा विषय बनलेला असतो. पवारांच्या काम करण्याच्या क्षमतेविषयीसुद्धा नेहमीच चर्चा होत असते. अशातच पवारांना 200 किमी अंतरावरून दुचाकीने प्रवास करत एका शेतकऱ्यांने भाजीपाला आणून दिला असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. तसेच, अशा शेतकऱ्यांमुळेच काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचा दाखलाही त्यांनी दिला आहे.

शरद पवार यांना देशात नेहमीच शेतकऱ्यांचे नेते मानले जाते. केंद्रातही आघाडी सरकारच्या काळात त्यांनी सलग दहा वर्षे काम केलेले आहे. त्याचसोबत त्यांचे शेतविषयी असलेले प्रेम हे सर्वांना ठाऊक आहे. शेतीप्रश्नाविषयी पवार हे नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. नेहमीच शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. सत्तेत असो वा नसो शरद पवार हे नेहमी शेतीप्रश्नावर पुढे आलेले पाहायला मिळाले आहेत.

वाढदिवसालाच सलमान खान बनणार मामा?

दरम्यान, राज्यात मोठ्या सत्ता पेचानंतर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता असून पवारांची यामध्ये मोठी भूमिका राहिलेली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयोगातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT