those who leave party are defeated sharad pawar criticize ajit pawar group politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Case : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाचे वेळापत्रक ठरले; बारा दिवसांमध्ये अंतिम निर्णय येणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेना आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे.

संतोष कानडे

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेना आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. त्या प्रकरणात तारखांवर तारखा सुरु आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरले आहे.

२ जुलै रोजी अजित पवारांनी पक्षातल्या आमदारांना सोबत घेऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह अजित पवार गटाचे ९ आमदार मंत्री झाले. शिवाय चाळीसपेक्षा जास्त आमदार अजित पावारांसोबत गेले. त्यामुळे शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रता प्रकरणासाठी याचिक दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणीसाठी १२ दिवसांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक

  • ६ जानेवारी - राष्ट्रवादीचे दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.

  • ८ जानेवारी - याचिकेसाठी अधिकची, अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ

  • ९ जानेवारी - फाईल्स किंवा अधिकची, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. मात्र, ९ तारखेनंतर ऐनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाही. अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.

  • ११ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासेल.

  • १२ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.

  • १४ जानेवारी - सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस. (NCP MLA disqualification hearing schedule)

  • १६ जानेवारी - विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.

  • १८ जानेवारी - प्रतिज्ञापत्र सादर करणे

  • २० जानेवारी - अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी होतील

  • २३ जानेवारी - शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी होतील

  • २५ आणि २७ जानेवारी - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद संपन्न होतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: श्री बालाजी महाराज मंदिरात विराजमान

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT