Jitendra Awhad Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यात बॉम्ब असल्याच्या फोनमुळे खळबळ, मध्यरात्री ठाणे पोलिसांची पळापळ

Phone Call Bomb In Jitendra Awhad Bungalow: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याच्या एक निनावी फोन काल आला होता. त्यामुळे रात्री खळबळ उडाली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याच्या एक निनावी फोन काल आला होता. त्यामुळे रात्री खळबळ उडाली. हा फोन आल्यानंतर बॉम्बशोधक विभागाने मध्यरात्री १२ वाजता तपासणी केली. पण, तपासात काहीही सापडलेलं नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती, अश्या प्रकारे त्यांनी ट्विट देखील केलं होतं. या फोनमुळे ठाणे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. या फोननंतर अचानक आव्हाड यांच्या घरी खळबळ उडाली.

यासंबधी अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा बंगल्यात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा माहिती सापडली नाही. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना त्रास देणारी नेमकी व्यक्ती कोण याचा पोलिस शोध घेत आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं ट्विट

दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक गृहस्थ व्हिडिओ कॉलवर कुणाशी तरी बोलत होते. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. ती एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्यासोबत असणाऱ्या पोलीस आणि मुलांना सांगून सावध केलं.

मात्र, तेवढ्यात तो हातून निसटून हॉटेल ट्रायडंटमध्ये १९ व्या मजल्यावर कुठे तरी गेला. ही बाब नंतर माझ्या कानावर घालण्यात आली. माझ्यासोबत असलेल्या मुलांनी त्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण, तो त्यांच्या हाती लागला नाही, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सोशम मिडीया अकाऊंटवरून सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT