NCP MLA Jitendra Awhad slam BJP Over chandrayaan-3 And EVM Machin Tempering  
महाराष्ट्र बातम्या

भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवलं, मग..."; आव्हाडांनी बोलून दाखवली EVM बद्दलची शंका

रोहित कणसे

चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक केलं जात आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहचणार भारत जगातील पहिला देश बनला आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक वेगळीच शंका व्यक्त केली आहे.

मागील बऱ्याच काळापासून देशातील विरोधी पक्षांकडून इव्हीएम मशीनबाबत शंका व्यक्त केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आता चांद्रयान-३ मिशनचा दाखला देत इव्हीएम मशीनवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

"भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवलं गेलं. आणि त्यात यशस्वी देखिल झाले. मग EVM च्या मार्फत मतदान कोणाला करायचं हे ठरवणं काय अवघड आहे. जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकतं. विषय फार सोपा आहे. समजून घेतला पाहिजे." असं पोस्ट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया साइट 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर केली आहे. आव्हाडांच्या या दाव्यामुळे आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.

२३ ऑगस्ट रोजी भारत एक 'स्पेस पावर' म्हणून जगासमोर आला आहे. देशाच्या तिसर्‍या चंद्र मोहिम चांद्रयान-३ मधील तील लँडर विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि भारताने इतिहास रचला. या यशस्वी लँडिंगमुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला आहे. चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर भारताचे हे मोठे यश जागतिक मीडियाने देखील उचलून धरले. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधील सर्व मोठ्या वृत्तपत्रांनी चांद्रयान-३ च्या लँडिंगचे लाईव्ह कव्हरेज केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT