NCP MLA Rohit Pawar On meeran borwankar allegation on ncp ajit pawar political news  
महाराष्ट्र बातम्या

'त्या नावाजलेल्या अधिकारी, सरकारला वाटत असेल तर...'; अजितदादांवरील बोरवणकरांच्या आरोपांवर रोहित पवारांचं सूचक वक्तव्य

रोहित कणसे

पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी अजित पवारांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांनी ते पुस्तक लिहीलं आहे, त्या नावाजलेल्या अधिकारी आहेत. पण सरकारला वाटत असेल तर त्याची शहानिशा करावी. पण कोणी कुठली जमीन घेतली, काय भ्रष्टाचार केला, कोणी कुठलं पद मिळवलं, कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री यावर चर्चा करण्यापेक्षा युवकांवर चर्चा करण्याची गरज आहे.

उद्या माझ्यावर चौकशी चालू आहे. माझ्यावर विविध स्वायत्त संस्था, पल्युशन बोर्ड, इन्कम टॅक्सची चौकशी चालु आहे. माझ्यावर चालू आहे तर मग सत्तेत असलेल्या व्यक्तीवर चालू करण्यास काय हरकत आहे असे रोहित पवार म्हणाले आहेत. रोहित पवार एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नेमकं प्रकरण काय आहे?

माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकांत अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. येरवड्यातील पोलिस स्टेशनच्या जमिनीचा लिलावाचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असे या पुस्तकात देण्यात आले आहे. मीरा बोरवणकर यांनी २०१० मधील प्रकरणाचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

तीन एकर जागा एका खासगी बिल्डरला देण्यात आली. या जागेवर पोलिस कार्यालय उभारले जाणार होते असा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी असताना, मला एक दिवस विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्या बद्दल विचारत आहेत. त्यांना तुम्ही एकदा भेटा. येरवाडा पोलिस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय असल्याचं त्यांनी मला सांगितलं.

बोरवणकर यांनी पुढे सांगितलं की, विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्याची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलिस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी सांगितलं की या जमिनीला लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत जमीन हस्तांरणाची प्रक्रिया पार पाडावी.

मी पालकमंत्र्यांना सांगितलं की येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही. तीन एकर जागा एका खासगी बिल्डरला देण्यात आली. या जागेवर पोलिस कार्यालय उभारले जाणार होते. मंत्र्यांनी माझं ऐकलं नाही, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण झाला, असा दावा मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. दरम्यान या दाव्यानंतर आता राजकारण तापू लागलं असून अजित पवार याबद्दल काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT