Rohit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

लग्न ठरवायच्या बैठकीतच यांची एवढी भांडण, मग पुढे काय?: रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याने सत्तेत कोण येणार हे अद्याप निश्चित नाही. यावरूनच विरोधी पक्षांकडून यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून म्हटले आहे, की महाराष्ट्राला असे अनेक नेते लाभले आहेत ज्यांच्याबद्दल संपूर्ण राज्याला नेहमीच आदर राहिला, आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक. माझ्यामनात बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल आदर असण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे देशाच्या राजकारणात त्यांचं असलेलं वजन. निवडणूकीपूर्वी युती करताना सत्तेतला वाटा समान असेल असा शब्द शिवसेनेला देवून देखील सध्या भाजप ज्याप्रकारे आपला शब्द फिरवत आहे हे बघता प्रश्न पडतो की आज जर स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचं एवढं धाडस झालं असत का? राज्याचा एक नागरिक म्हणून सरकार स्थापनेला होत असणारा उशीर मला चिंताग्रस्त करत आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करून सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने आमच्या आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला , आम्ही त्याचा स्वीकार करून कामाला देखील लागलो आहे मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरू असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे. या वादाची दुसरी बाजू म्हणजे सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद बघता पुढच्या पाच वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का ? यापूर्वी देखील एकत्र सत्तेत असताना युतीमध्ये होणारा वाद सगळ्या राज्याने बघितला आहे. आतादेखील संख्याबळाच्या जोरावर भाजप ज्याप्रकारे शिवसेनेला अडचणीत आणायचा प्रयत्न करत आहे , त्यातून नवीन वाद उद्भवून पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता हार्बर मार्गावरही धावणार १५ डब्यांची लोकल, 'या' स्थानकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं! रिझर्व्ह बँकेने ठोठावला 7 लाखांचा दंड; संचालकांच्या संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप भोवलं

हा ट्रेक नव्हता... निसर्गाशी झालेली जिवंत झुंज होती! लोणावळा ते भीमाशंकर ट्रेकचा अनुभव

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Jalgaon ACB Action : 'कॅल्क्युलेटर बाबा'च्या कार्यालयावर धाड! शेतजमीन मोजणीसाठी लाच घेताना 'भूमिअभिलेख'मधील दोघांना रंगेहाथ पकडले; जळगावातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT