rohit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Politics News: 'सोंगाड्यां'चं राज्य आलं खरं! रोहित पवारांचं ट्विट आलं चर्चेत

सध्या 'खोल दे मेरी जुबान' असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर

रुपेश नामदास

Rohit Pawar: दोन दिवसांपूर्वी, नागपूर हिवाळी अधिवेशनात आलेल्या आमदारांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था असलेल्या आमदार निवासात जेवणाची ताटं आणि कपबशा शौचालयात धुण्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना सभागृहात अपशब्द वापरल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले.

त्यामुळे चांगलाच गोंधळ पाहिला मिळाला त्यानंतर सरकारवर आरोप करण्यात येत आहे की सत्ताधारी पक्षातील नेते विरोधी पक्षातील नेत्यांना बोलून देत नाहीत. त्यामुळे विधी मंडळा बाहेर रोज निषेध नोंदवला जात आहे. अशातच राहित पवार यांच ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. रोहित पवार यांनी ट्विटमध्ये दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या नावांची उपमा देत ट्विटच्या माध्यमातून सरकारवर सडकून टीका केली आहे.

हेही वाचा-Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर, 'मला घेऊन चला' म्हणून 'पळवा पळवी' करत 'तुमचं आमचं जमलं' म्हणत 'सोंगाड्यां'चं राज्य आलं खरं!

पण सध्या 'खोल दे मेरी जुबान' असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर आलीय अरे राज्याच्या भल्यासाठी थोडी तरी 'आगे की सोच' असू द्या.. नाहीतर ज्यांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं तेच उद्या म्हणतील 'वाजवू का?" अशा शब्दात रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. शिंदे गट-भाजप सरकार बनवताना घडलेल्या गोष्टी या सिनेमांच्या नावांशी मिळते जुळते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ जणांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT