Saroj Ahire Kunal Patil
महाराष्ट्र बातम्या

Saroj Ahire: नेत्यांवर आंधळा विश्वास, मला मानसिक त्रास; आमदार सरोज अहिरेंचे स्पष्टीकरण

Sandip Kapde

Saroj Ahire :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांनी दावा केला. ही लढाई आता निवडणूक आयोगात गेली आहे. निवडणुक करण्यात आलेल्या याचिकेत अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे म्हटले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्या समर्थकांशी बोलून मी निर्णय घेणार आहे. मी अजित पवार आणि शरद पवार यांना भेटली आहे. माझ्यासाठी शरद पवार आणि अजितदादा एकच नाणं आहे. सर्वांशी चर्चा करुन मी माझा निर्णय घेणार आहे.

शरद पवार माझ्या वडीलांसारखे आहेत. दादांनी माझ्या मतदार संघात मला उभं करण्यासाठी मदत केली. त्यांचेही माझ्यावर उपकार आहेत. मतदारांशी बोलून मी माझा निर्णय घेणार आहे. याच परिस्थितीमुळे माझी तबियत खराब झाली आहे, असे अहिरे म्हणाल्या.

अजित पवार यांनी आयोगात केलेल्या याचिकेवर माझी सही आहे. मी मान्य करते कारण आमच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे. मी एकटी आमदार नव्हते अनेक आमदारांनी सह्या केल्या. याबाबत मी शरद पवार यांना देखील बोलले आहे. शपथविधी वेळी मी उपस्थित होते. त्यानंतर मी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलले.

अधिवेशनाच्या आधी मी माझी भूमिका जाहीर करेल. सही केली म्हणजे ते माझा पाठिंबा समजत असतील. मात्र तसे नाही. मतदारांशी बोलून मी भूमिका जाहीक करेल, असे सरोज अहिरे म्हणाल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT