महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : शरद पवार पुण्यात अन् राष्ट्रवादीचे आमदार निघाले मुंबईला? बनसोडे यांनी फोडलं गोड गुपित

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? हे कळायला मार्ग नाही. परंतु अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याचं उघडपणे बोललं जात आहे. शिवाय काल संजय राऊत यांनी शरद पवारांसोबतच्या बैठकीचा हवाला देऊन पवारांच्या कुटुंबावर दबाव असल्याचं म्हटलं होतं.

मागच्या आठवड्यात अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं. आजही अजित पवारांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे मुंबईकडे निघाले आहेत.

मी अजित पवारांसोबत आहे, ते घेतील तो निर्णय मान्य असल्याचं बनसोडे यांनी म्हटलं आहे. 'एबीपी माझा' आणि 'न्यूज १८ लोकमत'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. पक्षाच्या बैठकीला माझ्यासह सर्व आमदार मुंबईला निघाले असल्याचं बनसोडे यांनी सांगितल्याची माहिती आहे.

महत्वाचं म्हणजे खुद्द शरद पवार हे पुण्यात असतांना मुंबईमध्ये नेमकी बैठक कशासाठी बोलावली आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला रवाना झालेले आहे. आमच्याकडे कुणीही येऊ शकतं, असं विधान त्यांनी केलंय.

अजित पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता, परंतु ते अद्याप मुंबईतच आहे, अशी माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहेत. अजित पवार यांचे अचानक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT