NCP MLAs urge Ajit Pawar to take the post of Maharashtra state president at devgiri bungalow meeting Political news  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं! राष्ट्रवादीच्या आमदारांची आग्रही भूमिका; पक्षात हालचालींना वेग

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नुकतीच बैठक पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल देखील या बैठकीला हजर होते. प्रदेशाध्यक्षपदा संदर्भात ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान अजित पवार हे प्रदेशाध्यक्षपदावरून नाराज असल्याचे तसेच त्यांच्याकडून दबावतंत्र वापरले जात असल्याच्या देखील चर्चा आहेत.

दरम्यान आज अजित पवारांच्या बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यादरम्यान अजित पवार यांनी प्रदेश्ध्यक्ष व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी आमदारांनी केल्याचे समोर आले आहे. लवकरात लवकर याबाबत निर्णय व्हावा अशी आमदारांची आग्रही भूमिका असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान या बैठकीत अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावे असा आमदारांचा सूर पाहायला मिळाला. (Latest Marathi News)

नेमकं काय झालं?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाl पक्ष संघटनेत काम करण्यासाठी पद देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु झाली आहे.

आता प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे हे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते.

राष्ट्रवादीचे आमदार, जेष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष देवगिरीवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते.

यादरम्यान अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद द्यावे म्हणून हे आमदार लॉबिंग करत असल्याचं सांगितलं बोललं जातं आहे. त्यानंतर या बैठकीत पक्षातील संघटनात्मक बदलावरही चर्चा झाल्याचे देखील समजते. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजितदादांशी बोलल्यानंतर हे नेते शरद पवार यांचीही भेट घेणार का? हे देखील पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT