Sharad Pawar, Ajit Pawar and Jayant Patil  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : शरद पवार सोडून गेलेल्या आमदारांवर का टीका करत नाहीत? रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार पक्षउभारणीसाठी महाराष्ट्रात जाहीर सभा घेत आहेत. बीडमधील सभेनंतर येत्या २५ ऑगस्टला कोल्हापूर येथे शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या आधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या कोल्हापूर येथे आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी शरद पवार सोडून गेलेल्या आमदारांवर का टीक करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर दिलं.

शरद पवार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाहीर सभा घेत आहेत. या सभांमध्ये शरद पवार हे अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीक करत नसल्याने या आमदारांचे परतीचे दोर कापले गेले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याबद्दल रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवारांचा ६० वर्षांचा राजकीय अनुभव आहे. जेथे भाजपचा राजकारणाचा विचार संपतो, तेथे साहेबांचा सुरू होतो. आता भाजपने कुटुंब फोडलं, पक्ष फोडला. फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिवेसना देखील फोडली. ज्या शक्तीने ताकद लावून या सगळ्या गोष्टी केल्या त्यांना सोडून काय करयचंय. उलट वार मुळावर होणं गरजेचं आहे.

शिवसेना फुटली त्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंचा गट भांडत राहिले. भाजप बाजूला राहिलं. भाजप जर प्रमुख असेल तर त्याला टार्गेट करायला काय हरकत आहे. उद्धव ठाकरे वर्षानंतर भाजपला टार्गेट करत आहेत, शरद पवार सुरुवातीपासूनच भाजपला टार्गेट करत आहेत. यामागे दोन कारणं असू शकतात एक मुळावर वार करायचा आणि जे गेलेत त्यांना जास्त महत्व द्यायचं नाही असे रोहित पावर यावेळी म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

शरद पवार यांच्या कोल्हापूरातील सेभेच्या तयारीविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले की, पुरोगामी विचारांचा पगडा कोल्हापूरवर आहे. आम्ही कार्यकर्ते फक्त चर्चेसाठी आलो आहोत, जी ताकद आहे ती येथील कार्यकर्त्यांची आहे असे रोहित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT