Amol Kolhe Esakal
महाराष्ट्र बातम्या

Amol Kolhe: शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान! खासदार कोल्हेंनी प्रसाद लाडांना जोडले हात; म्हणाले...

शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरुन प्रसाद लाड यांनी वादग्रस्त विधान केलं

सकाळ डिजिटल टीम

एकिकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या विधानांमुळे चर्चेत आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच, आणखी एका नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मासदंर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू झाला आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. आमदाराच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया येत आहेत. तर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रसाद लाडांसमोर जोडले कोपरापासून हात जोडले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असं वक्तव्य भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी तर त्यांच्या या वक्तव्यानंतर कोपऱ्यापासून हात जोडले आहे. काय ते अगाध ज्ञान, असं म्हणत कोल्हेंनी प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल करणारे ट्वीट केले आहे.

हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे म्हणतात की, वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर! अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की, अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा? असं म्हणतं कोल्हे यांनी खरमरीत टीका केली आहे. तर आता हसावे की रडावे या पलीकडील उद्विग्नता आहे. निषेध किंवा धिक्कार करणे पालथ्या घड्यावर पाणी आहे. पुन्हा इतिहास रूजवावा लागणार, जागवावा लागणार! असं अमोल कोल्हे यांनी ट्विटमद्धे म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT