NCP MP amol kolhe commented on controversy over calling sharad pawar janta raja maharashtra politics r  Sakal
महाराष्ट्र बातम्या

…तर शरद पवारही ते मान्य करणार नाहीत; 'जाणता राजा' प्रकरणी कोल्हेंचं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेत की धर्मवीर हा वाद संपतो न संपतो तोच शरद पवारांना जाणता राजा म्हणण्यावरून नवा वाद पेटला आहे. याबद्दल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना तुम्ही शरद पवार यांना तुम्ही शरद पवरांना जाणता राजा मानता का? असा थेट प्रश्न विचारण्यात आला.

मी एक गोष्ट मानतो की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय राजे होते. माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहचता येते, याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

मागे एका मंत्रीमहोदयानी त्यांच्या नेत्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. जर जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं कोणी म्हणतं असेल, की अमुक एका व्यक्तीला जानता राजा म्हटलं म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजच म्हटलंय तर प्रत्येकाचाच त्याला विरोध असेल. माझाचं काय स्वतः शरद पवार हे देखील ही गोष्ट अमान्य करतील.

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की, पण सर्व व्यवस्थेची माहिती असलेलं, जाणं नेतृत्व या भावनेनं म्हटलं असेल, तर ती जाण असणं, माहिती असणं हे कुणालाही वाईट नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. कोणी प्रयत्नही करू नये असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्टपणे सांगितलं.

तसेच हात जोडून विनंती आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या आपल्या प्रतिकांना अकारण रोजच्या राजकारणात ओढू नका, असेही कोल्हे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT