महाराष्ट्र बातम्या

अमोल कोल्हे यांचं रुग्णालयातून खास आवाहन

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे नेते व शिरूरचे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे लसींचे दोन डोस घेवूनही कोरोना बाधित झाले आहेत. कोरोना उपचारासाठी अनेक सुसज्ज रुग्णालये उपलब्ध असतानाही त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विश्वास दाखवत शासकीय रुग्णालयाचाच पर्याय निवडला आहे.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबतची माहिती फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दोनवेळा कोरोना प्रतिबंधक लस घेऊन सुद्धा माझी कोरोना टेस्ट पॉजिटीव्ह आली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही याची प्रचिती स्वत: मला आलेली आहे. हा डेल्टा व्हेरीयंट असू शकतो. कारण तो लस घेतल्यानंतरची प्रतिकारशक्ती सुद्धा भेदू शकतो. महाराष्ट्र शासनाची आरोग्य व्यवस्था सक्षम असून माझा त्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी कोरोना उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या 'सेव्हेन हिल्स रुग्णालयात' उपचारासाठी दाखल झालो आहे. लसीचे दोन डोस घेतले म्हणजे धोका टळला असे समजून गाफिल राहू नका. सर्वांनी कोरोनाचे नियम निर्बंध काटेकोरपणे पाळा. असे कळकळीचे आवाहन करीत त्यांनी विविध माध्यमातून काळजी व्यक्त करणाऱ्या व लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या हितचिंतकांचे आभारही मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT