Praful Patel  sakal
महाराष्ट्र बातम्या

Delhi Service Bill: राष्ट्रवादीची राज्यसभेत संभ्रमी खेळी! कुठलाही व्हिप नाही; पवार हजर, प्रफुल्ल पटेल गैरहजर

राज्यसभेत दिल्ली विधेयक सादर झालं, त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल गैरहजर होते.

सकाळ डिजिटल टीम

Delhi Bill in Rajyasabha:दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेतही मंजूर झालं. पण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संभ्रमी खेळी पहायला मिळाली. कारण यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून कुठलाही व्हिप काढण्यात आला नव्हता.

तसेच शरद पवार या विधेयकाला विरोध करण्यासाठी सभागृहात हजर होते. पण प्रफुल्ल पटेल यांनी दांडी मारली. पवार हजर राहतील हे अपेक्षित होतं पण पटेल गैरहजर राहिल्यानं वेगळ्याचं चर्चेला तोंड फुटलं आहे.

लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक पारित झाल्यानंतर सोमवारी (७ ऑगस्ट) रात्री हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आलं. या विधेयकावर प्रचंड गोंधळही झाला. या विधेयकावर वोटिंग करताना ऑटोमॅटीक वोटिंग मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर बॅलेट पेपरवर ही वोटिंग पार पडली.

सत्ताधारी पक्षाने सादर केलेल्या विधेयकाला १३१ खासदारांनी पाठिंबा दिला, तर १०२ खासदारांनी विरोध दर्शवला. मात्र, अशा महत्वाच्या विधेयकाच्यावेळी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल गैरहजर होते.

दिल्ली विधेयकाला गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय. प्रफुल्ल पटेल महत्वाच्या विधेयकाला का गैरहजर होते, याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

राष्ट्रवादी पक्षाने दिल्ली विधेयकासाठी कुठलाही व्हीप काढला नव्हता. राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार गट सत्तेत सामील झालाय. जर राष्ट्रवादी पक्षाने व्हीप काढला असता, तर पक्षातील दोन गटांमुळे व्हीपचं उल्लंघन झालं असतं. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकली असती.

या कायद्याअंतर्गत जर उमेदवाराने पक्षाचा व्हीप पाळला नाही तर, त्याच्या सदस्यत्वाला धोका निर्माण झाला असता. राष्ट्रवादी पक्षाने व्हीप न काढून आपल्या खासदाराचं सदस्यत्व वाचवलंय का? असाही प्रश्न निर्माण होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT