supriya sule ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: "... ते तर कोणीच सांगू शकत नाही", सुप्रिया सुळेंची अजित पवार प्रकरणावर मिश्किल प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी होणारे सर्व दावे खोडून काढलेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेत बंड होऊन शिवसेनेत भाग पडले. राज्यात सत्तांतर झाले तेव्हापासून राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच काही नेते दावे करताना दिसून येतात.

तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी सत्ताधारी शिवसेना हरली तर? कोर्टाचा निकाल शिंदेंच्या विरोधात लागला तर? भाजपची पुन्हा कोंडी होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे भाजपचा बॅकअप प्लॅन तयार असल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

गेल्या काही दिवसात शरद पवार यांची विविध मुद्द्यांवरील भूमिका, अजित पवार यांचं १७ तास गायब होणं, अंजली दमानियांचं ट्विट, भाजपचा प्लॅन बी या सर्व सुरू असणाऱ्या चर्चेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना सर्व दावे खोडून काढले आहेत. 'पण 15 मिनिटांनी पाऊस पडेल का, हे मीही सांगू शकत नाही', अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.

अंजली दमानिया काय म्हणाल्यात..

"आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत.... तेही लवकरच. बघू..... आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची..." असं ट्वीट दमानिया यांनी केलं आहे.

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. महाविकास आघाडी आणि त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT