nawab mailk
nawab mailk esakal
महाराष्ट्र

फडणवीसांच्या आरोपांवर आज नवाब मलिक फोडणार 'हायड्रोजन बॉम्ब'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणी भाजप सरकार व NCB विरोधात अनेक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांचे आरोप खोडून काढले होते. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर आता नवाब मलिक यांनी आव्हान देत देवेंद्र फडणवीस यांचेच अंडरवल्डशी संबध असल्याचा खुलासा करणार आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. यावर आज सकाळी 10 वाजता नवाब मलिक (Nawab Malik) पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहेत. दरम्यान आज मलिक कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी नातं उघड करणार - मलिक

काल फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मलिक यांनी म्हटलं होतं की, उद्या सकाळी फडणवीसांचं अंडरवर्ल्डशी असलेलं नातं उघड करणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या मदतीनं राज्य वेठीला धरलं. फडणवीसांचे अंडरवल्डशी संबध असल्याचा खुलासा करणार असून उद्या मुंबईत अंडरवर्ल्डचा हायड्रोेजन बॉम्ब फोडणार, फक्त १० वाजेपर्यंत थांबा असे मलिक म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांवर (Nawab Malik) गंभीर आरोप केले आहेत. कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड ही जमीन नवाब मलिकांनी दाऊदच्या माणसांकडून विकत घेतली, असा गंभीर आरोप फडणवीसांचा आहे. त्यानंतर आता मलिकांनी फडणवीसांना उत्तर दिले आहेत.

नवाब मलिक यांनी आज ट्विट करत आव्हान केले आहे.

उनकी नींद खो गई है,

अब चैन खोने का वक़्त आ गया है,

मिलते है आज सुबह १० बजे

फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या साथीनं राज्य वेठीस धरलं होतं. असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. फडणवीस माझं नाव खराब करण्याचं काम करत आहेत. त्यामुळं नवाब मलिक आज नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष लागून आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक बोलताना काल म्हणाले की, "देवेंद्रजी तुम्ही थेट बॉम्ब ब्लास्ट, दाऊद, अंडरवर्ल्डशी जोडून माझी प्रतिमा मलीन करण्याचं नाव करत आहात. काही दिवसांपूर्वी तुम्ही पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिकांच्या जावयाच्या घरी गांजा सापडला असं म्हणाला होतात. याप्रकरणी माझी मुलगी उद्या तुम्हाला नोटीस पाठवणार आहे. आरोप लावून तुम्ही माफी मागणार नसाल तर आम्ही आशा करतो की, या लढाईत तुम्ही माफी मागणार नाही, लढाई सुरुच ठेवू." तसेच पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "ही फाईल एनआयएकडे द्या किंवा सीबीआयकडे द्या, मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. जे आज मी बोलतोय, तो सगळा घटनाक्रम जसंच्या तसं घडला आहे. एनआयए असो किंवा सीबीआय चौकशी करो. त्यांना वाटेल नवाब मलिक घाबरणार. पण नवाब मलिक घाबरणार नाही."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT