Sharad Pawar And Chhagan Bhujbal 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : तुरुंगातून सुटल्यावर अनेकांनी सांगितलं, तिकीट देऊ नका, तरी मंत्रीपदही दिलं; भुजबळांबाबत पवारांची खंत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज सभेत जोरदार भाषण करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. बडव्यांनी पांडुरंगाला भेटू दिलं नाही, असंही ते म्हणाले. त्याला जयंत पाटलींना प्रत्युत्तर दिलंच. शिवाय शरद पवारांनी देखील छगन भुजबळांंबाबत खंत व्यक्त केली.

शरद पवार म्हणाले की, त्यांना माहित आहेत, आपलं नाणं खणखण वाजत नाही, त्यामुळे माझे फोटो वापरण्यात येतात. अनेकांनी सांगितल, की पांडुरंगाला बडवे येऊ देत नाही. मात्र पांडुरंगाच्या दर्शनाला या देशात कोणीच थांबवू शकत नाही. वारीला लोक जातात. पांडुरंगाच्या दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात पोहोचल्यावर बाहेरून दर्शन घेतात, आणि घराकडे निघतात. मात्र आता आमच्याकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगण्यात येत.

पवार पुढं म्हणाले की, भुजबळ तुरुंगात गेले, तेव्हा त्यांच्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते केले. ते बाहेर आल्यानंतर काही लोकांनी सांगितलं, भुजबळ तुरुंगात राहिले, त्यांना संधी देऊ नका. पण मी म्हटलं, ते चालणार नाही. त्यांच्यावर अन्याय झाला, असं मला वाटतं. त्या अन्यायामुळे ते तुरुंगात गेले. अशा वेळी त्यांच्यामागे पक्ष उभा राहणार. त्यांना तिकीट दिलं. सरकार आलं. पक्षातील दोघांची शपथविधीसाठी नावे द्यायची होती. त्यात पहिलं नाव भुजबळांचं दिलं.

मला आठवतं, सकाळी मला फोन आला. ते म्हणाले काय चाललं. मी म्हटलं मलाही माहित नाही. ते म्हणाले मी जातो, बघतो आणि तुम्हाला कळवतो. त्यानंतर ३ वाजता पाहिलं मी त्यांनी शपथच घेतली. कोणा काय करेल याचा नेम नाही, असंही पवार म्हणाले. राज्यकर्ते किमान राज्य एकत्र ठेवणारे असावे, असंही पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT