Rohit Pawar on NCP Party and Symbol Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar on NCP Party and Symbol: 'पक्षाचा बाप आमच्यासोबत....', लढू आणि जिंकू; रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास

Rohit Pawar on NCP Party and Symbol: 'आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!', असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी लढू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाने ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान रोहित पवार यांनी 'आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!', असं म्हणत लढू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मिडीया एक्सवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की, "केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते….आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!#लडेंगे_और_जितेंगे!"

अजित पवार यांची प्रतिक्रिया

"आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी एक्सवर पोस्टमध्ये स्वत:ला राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केलं आहे.

अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनिल तटकरे यांची प्रतिक्रिया

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आम्ही अतिशय आनंदी आहोत. आयोगाने अत्यंत योग्य वेळी निर्णय देऊन भारतीय लोकशाही सिद्धांतावर शिक्कामोर्तब केले याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांसमोर समाधान व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होताना, राज्यात महायुती सरकारमध्ये सहभागी होताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आपली भूमिका योग्यरीत्या बजावेल. महाराष्ट्रातील जनतेचा याला मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT