NCP President Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Satara : अजितदादांच्या बंडानंतर साताऱ्यात शरद पवारांची ग्रॅन्ड एन्ट्री; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

मकरंद पाटील हे शरद पवारांसोबत पाहून वाई विधानसभा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आपली भूमिकाही जाहीर केली होती.

अशपाक पटेल

शरद पवार, आमदार रोहित पवार व प्रतिभाताई पवार यांच्या सोबत वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील हे सुद्धा सोबत असल्याचं पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या.

शिरवळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर निरा नदीच्या तिरावर शिंदेवाडी (ता. खंडाळा) इथं जंगी स्वागत करण्यात आलं.

यावेळी शरद पवार, आमदार रोहित पवार व प्रतिभाताई पवार यांच्या सोबत वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील हे सुद्धा सोबत असल्याचं पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या.

अजित पवार यांच्या राजकीय बंडावेळी मकरंद पाटील यांचं नाव असल्याचं सांगण्यात आल्याने आज आमदार मकरंद पाटील हे शरद पवारांसोबत पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. मकरंद पाटील हे शरद पवारांसोबत पाहून वाई विधानसभा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आपली भूमिकाही जाहीर केली होती.

आता शरद पवारांसोबत पाहून त्यांची गोची होणार आहे. दरम्यान, शरद पवार यांचे पुष्पहार व प्रचंड घोषणाबाजी करून जिल्ह्याच्या प्रवेशव्दारावर स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, मनोज पवार, राजेंद्र तांबे, सरपंच रविराज दुधगावकर, उपसरपंच ताहेर काझी, हणमंतराव सांळुखे, अजय भोसले, आदेश भापकर,अमीर काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर खंडाळ्यातही पवारांचे विजयराजे धमाळ व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून जंगी स्वागत केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT