devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: पुण्यात राष्ट्रवादीने लावले देवेंद्र फडणवीसांचे बॅनर, केली ही मागणी

बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावण्यात आलेत तर काय म्हटलंय राष्ट्रवादीने या बॅनरमध्ये वाचा सविस्तर

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरातील बॅनरबाजी चांगलीच चर्चेत असते. यामध्ये कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक असो, सत्तासंघर्षावर सरन्यायाधिशांना उद्देशून असो, किंवा आताच्या लोकसभा पोटनिवडणुकीवरुन भावी खासदार असो नाहीतर मग गेल्या काही दिवसांपासुन भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर चांगलेच चर्चेत आले. परंतु आता चर्चा सुरू आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरची. विशेष म्हणजे राष्टवादीच्या नेत्याने हे बॅनर लावले आहे. (Latest Marathi News)

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरमध्ये काही प्रश्न उपस्थित करत त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.(Latest Marathi News)

काय लिहंल आहे बॅनरमध्ये?

थे महिला सुरक्षित नाहीत…चालू लोकलमध्ये बलात्कार

इथे व्यापारी सुरक्षित नाहीत… खंडणीखोर व कोयता गँगची दहशत

इथे नेते सुरुक्षित नाहीत…विरोधी पक्षातील नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे

इथे पत्रकार सुरुक्षित नाहीत…पत्रकारांना गाडीखाली चिरडलं जाते

इथे रोज जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जातात. दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय…तरीही कुठलीही ठोक सरावाई नाही

भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून रोज जनसामान्यांची फसवणूक होत आहे…

banner

राज्यात बलात्कार, कोयता गँगची दहशत, वरिष्ठ नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणे , पत्रकारांना गाडीने चिरडणे, जाती धर्मात जाणीवपूर्वक दंगली घडवणे असे प्रकार वारंवार होताना दिसत आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही आणि परिस्थिती हाताळण्यात गृहमंत्री असमर्थ आहे, अशा स्वरूपाचे बॅनर पुणे शहरात लावण्यात आले आहेत.(Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सलचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप हूमे यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यांनी बॅनरमधून फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT