ncp released first candidate list for vidhansabha election 2019 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : रोहित पवार, भुजबळ, मलिक रिंगणात; पाहा पूर्ण यादी 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज रात्री जाहीर केली. यामध्ये, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, बारामतीमधून अजित पवार, तर परळीतून धनंजय मुंडे यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आजच्या यादीत विधानसभेतील विद्यमान 19, तर विधान परिषदेतील एका आमदाराचा समावेश आहे. अदिती तटकरे (श्रीवर्धन), नवाब मलिक (अणुशक्तीनगर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा), पृथ्वीराज साठे (केज) यांच्याही नावाचा यादीत समावेश आहे. 

भाजप-शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या यादीत या बंडखोरांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, पक्षातील निष्ठावंत घराणी व आजी-माजी आमदारांना उमेदवारी देत राष्ट्रवादीने नवे वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक तरुण व नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने त्यांनी भाजप व शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. उर्वरित यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

"राष्ट्रवादी'ची यादी 
संदीप बेडसे - सिंदखेडा (धुळे) 
जगदीश वळवी - चोपडा (जळगाव) 
पुष्पा ज्ञानेश्वर महाजन - जळगाव ग्रामीण 
अनिल भाईदास पाटील - अमळनेर 
डॉ. सतीश पाटील- एरंडोल 
राजीव देशमुख- चाळीसगाव 
दिलीप वाघ - पाचोरा 
संजय गरुड - जामनेर 
राजेंद्र शिंगणे - सिंदखेडराजा (बुलडाणा) 
रवीकुमार राठी - मूर्तिजापूर 
राजू तिमांडे - हिंगणघाट (वर्धा) 
अनिल देशमुख - काटोल (नागपूर) 
विजय घोडमारे - हिंगणा 
इंद्रनील मनोहर नाईक - पुसद (यवतमाळ) 
प्रदीप नाईक- किनवट (नांदेड) 
दिलीप शंकरअण्णा धोंडगे - लोहा 
चंद्रकांत नवघरे - वसमत (हिंगोली) 
विजय भांबळे - जिंतूर (परभणी) 
राजेश टोपे - घनसावंगी (जालना) 
बबलू चौधरी - बदनापूर 
चंद्रकांत दानवे - भोकरदन 
नितीन पवार - कळवण (नाशिक) 
छगन भुजबळ - येवला 
माणिकराव कोकाटे - सिन्नर 
दिलीप बनकर - निफाड 
नरहरी झिरवळ - दिंडोरी 
सुनील भुसारा - विक्रमगड 
दौलत दरोडा - शहापूर 
प्रमोद हिंदूराव - मुरबाड 
भरत गंगोत्री - उल्हासनगर 
प्रकाश तरे - कल्याण (पूर्व) 
जितेंद्र आव्हाड - मुंब्रा-कळवा 
धनंजय पिसाळ - विक्रोळी 
विद्या चव्हाण - दिंडोशी 
नबाव मलिक - अणुशक्तीनगर 
अदिती तटकरे - श्रीवर्धन 
अतुल बेनके - जुन्नर 
दिलीप पाटील - आंबेगाव 
अशोक पवार - शिरूर 
रमेश थोरात - दौंड 
दत्तात्रय भरणे - इंदापूर 
अजित पवार - बारामती 
सुनील टिंगरे - वडगाव शेरी 
सचिन दोडके - खडकवासला 
अश्विनी कदम - पर्वती 
चेतन तुपे - हडपसर 
किरण लहामटे - अकोले 
आशुतोष काळे - कोपरगाव 
प्रताप ढाकणे - शेवगाव 
नीलेश लंके - पारनेर 
संग्राम जगताप - नगर शहर 
रोहित पवार - कर्जत जामखेड 
विजयसिंह पंडित - गेवराई 
प्रकाश सोळंके - माजलगाव 
संदीप क्षीरसागर - बीड 
पृथ्वीराज साठे - केज 
धनंजय मुंडे - परळी 
बाबासाहेब पाटील - अहमदपूर 
संजय बनसोडे - उदगीर 
राहुल मोटे - परांडा 
भारत भालके - पंढरपूर 
दीपक चव्हाण - फलटण 
मकरंद पाटील - वाई 
शशिकांत शिंदे - कोरेगाव 
बाळासाहेब पाटील - कऱ्हाड उत्तर 
सत्यजित पाटणकर - पाटण 
दीपक पवार - सातारा 
संजय कदम - दापोली 
सहदेव बेटकर - गुहागर 
शेखर निकम - चिपळूण 
सुदेश मयेकर - रत्नागिरी 
बबन साळगावकर - सावंतवाडी 
के. पी. पाटील - राधानगरी 
हसन मुश्रीफ - कागल 
जयंत पाटील - इस्लामपूर 
मानसिंग नाईक - शिराळा 
सुमन पाटील - तासगाव-कवठे महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT