Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : '...अन् मिरवायचं मात्र दोघांनीच!'; अजित पवारांना जाहिरातीतून वगळल्याने रोहित पवारांची टीका

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पक्षात मात्र उभू फूट पडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरूद्ध अजित पवार असे दोन गट पक्षात पडले. दरम्यान अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाची मात्र कोंडी झाल्याचे पाहायला मिळालं.

दरम्यान यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्यात पुन्हा निधी वाटपावरून नाराजीच्या चर्चा आहेत. यादरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या ट्वीट मुळे राज्यातीस शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील सहकारी पक्षांमध्ये सर्व काही अलबेल आहे ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सध्या शरद पवार यांच्या गटात असलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये हा व्हिडीओ काल रात्री काढलेला असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला सावण्यात आलेला जाहिरातीचा डिजीटल बोर्ड दिसत असून यावर राज्य सरकारच्या जाहिरात दाखवण्यात येत आहेत.

अजित पवार गायब

आपला दावाखाना या सरकारी उपक्रमासह इतरही अनेक सरकारकडून देण्यात येणाऱ्या जाहीराती या बोर्डवर दिसत आहेत. मात्र या जाहीरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस हे दोघेच दिसत आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना या जाहीरातींमधून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे रोहित पवारांनी "सरकार चालवायचं तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी!" असं खोचक ट्वीट केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार निधी वाटपामध्ये भेदभाव करतात, आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही, असा आरोप करत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा गट बाहेर पडला. शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली, मात्र त्यानंतर आता अजित पवार सरकारमध्ये समील झाले आणि अर्थ खात्याचा कारभार देखील त्यांच्याकडे आला आहे.

अजित पवारांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यावरून शिंदे गटात नाराजीच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यानंतर आता नुकतेच झालेल्या निधी वाटपात देखील अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांना भरघोस निधी दिला हे. तसेच नाराजी टाळण्यासाठी शिंदे गटातील काही आमदारांना देखील काही प्रमाणात निधी मंजूर केल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT