Sharad Pawar CM Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ...तर त्यांचं म्हणणं मान्य करेन; कांदाप्रश्नी शरद पवारांचं CM शिंदेंना प्रत्युत्तर

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पक्षाच्या उभारणीसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. बीडमधील सभेनंतर आज (२५ ऑगस्ट) कोल्हापूर येथे शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान या सभेपूर्वी शरद पवारांनी बारामती येथे बोलतना कांदाप्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्तुत्तर दिलं आहे.

केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लावण्याचा निर्णय घेतला. यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्यानंतर सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा २,४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शरद पवारांनी सरकारने ४ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करावा, अशी मागणी केली होती.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या या मागणीला उत्तर देताना, शरद पवार हे मोठे नेते आहेत. ते १० वर्ष देशाचे कृषीमंत्री होते. त्यावेळीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, संकटकाळात त्यांनी कांद्याबाबत असा निर्णय घेतला नाही असं उत्तर देत टीका केली होती. आता यावर शरद पवारांनी देखील प्रत्तुत्तर दिलं आहे.

या मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी कृषी मंत्री असताना चाळीस टक्के कर कधी लावला नव्हता. युतीत हा प्रश्न झाला कसा, तुम्ही ४० टक्के कर लावला कसा? तुम्ही ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करा प्रश्न संपतो. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणत आहेत, त्याला काही अर्थ नाही. ते अर्धवट माहिती देत आहेत. त्यांनी ४० टक्के निर्यात शुल्क वाढवल्याबद्दलचा खुलासा करावा. तो रद्द होत असेल तर त्यांचं म्हणणं मी मान्य करेन असेही शरद पवार म्हणाले.

साखरेच्या निर्यातीवरून बंधन आणावीत याबाबत चर्चा केंद्र सरकारच्या मंत्रालयात चालू आहे. याबाबत माझी काही लोकांची चर्चा देखील सुरू आहे. यातून साखरेवर सुद्धा निर्यात निर्यातीवर बंधने येतील आणि ही बंधने झाली तर बाजार भाव खाली येतील असेही शरद पवार म्हणाले.

अजित पवार गटाकडून उत्तर सभा घेतल्या जात आहेत, त्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे यामध्ये कोणीही चिंता करण्याची गरज नाही. कोणीही जाहीर सभा घेऊ शकतो यामुळे जनतेला नक्की काय सत्य आहे ते माहिती आहे. जर सभा घेऊन कोण आपली भूमिका मांडत असेल तर मी त्यांच स्वागत करतो.

नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही ? याला फूट कशी म्हणता येईल. पक्षात फूट कधी होते जर जर पक्षातच एक मोठा गट वेगळा झाला देशपातळीवर अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फुट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे, असेही शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT