Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra Politics Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar-Ajit Pawar : काका-पुतण्याच्या भेटीचा नेमका अर्थ? 'इंडिया'चा...

रवींद्र देशमुख

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला जात आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यातच अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची गुप्त भेट घेतली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील यावेळी उपस्थित होते. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ लावण्यात येत आहेत. यासंदर्भात सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी 'साम'शी बोलताना काका-पुतण्याच्या भेटीचा राजकीय अर्थ सांगितला.

सम्राट फडणीस म्हणाले की, दोन्ही गटातील तणाव निवळला की, नाही हे सांगता येणार नाही. मात्र या भेटीवरून अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील चर्चेचे मार्ग अजुन खुले असल्याचं दिसून येतं. पुण्यात मोदींच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली नाही. पण चर्चेच पूर्ण दोर कापले नसल्याचं हे स्पष्ट आहे.

दरम्यान या डिप्लोमसीचा अजित पवार गटाला फायदा होईल, पण शरद पवार गटासाठी ही तोट्याचा भाग ठरू शकतो, असंही मत फडणीस यांनी व्यक्त केलं. त्यामुळे शरद पवार यांच्याविषयी संशयास्पद वातावरण तयार होत आहे. खरं तर हे शरद पवार गटाने रोखायला हवं होतं. पण तसं काहीही झालेलं दिसत नाही, असंही ते म्हणाले..

दुसरी बाजू म्हणजे, शरद पवार यांचं विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या पातळीवर शरद पवारांना किती महत्त्व आहे? तसेच राष्ट्रवादी वाढविण्यासाठी किती स्थान मिळतं, याचा विचार शरद पवारांच्या मनात असू शकतो. त्यामुळे इंडिया आघाडीवर अंकुश ठेवण्यासाठी अजित पवारांसोबतच्या बैठकीचा वापर केला जावू शकतो, अशी शक्यताही फडणीस यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT