Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : "देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपा नाही; आगामी बदलांसाठी ही गोष्ट अनुकूल"

याचे परिणाम पुढच्या निवडणुकीत बघायला मिळतील, असंही पवार म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

देशात नुकत्याच दोन राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देशातल्या भाजपाच्या सत्तेच्या स्थितीवर भाष्य केलं आहे. देशात बदलाचा सूर तयार होत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, "देशात बदलाचा सूर तयार होतोय. केरळमध्ये भाजपा नाही, तामिळनाडूमध्ये भाजपा नाही - कर्नाटकमध्ये तिथे काँग्रेस होतं, आमदार खासदार फोडले, आता भाजपा आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपा नाही."

शरद पवार पुढे म्हणाले, "सगळं चित्र दिसयंत ते देशात बदलाचं वारं असल्याचं आहे. त्याचे परिणाम पुढच्या निवडणुकीत बघायला मिळतील. पोटनिवडणूक विधान परिषदेत भाजपाला अपेक्षित यश नाही. देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपा नाही. ही गोष्ट आगामी बदलांसाठी अनुकुल आहे. "

देशात नागालँड आणि त्रिपुरामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांच्या बालेकिल्ल्यातच ACB ची 'रेड'; महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, 50 हजारांची मागणी अन् 15 हजारांत...

Pune APMC: पुणे बाजार समितीतील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण करा; विरोधक आक्रमक, अहवाल सादर करण्याचे आदेश!

CJI Suryakant सकाळी पेपर… संध्याकाळी याचिका! सीजेआय सूर्यकांत यांच्या एका वाक्याने उघड झाला मोठा ‘खेळ’

T20 World Cup: दक्षिण आफ्रिका - वेस्ट इंडीज सामनाच ठरवणार भारताचं भविष्य! जाणून घ्या सर्व शक्यता अन् समीकरणं

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

SCROLL FOR NEXT