NCP Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : 'मी तसं बोललोच नाही!' अजित पवारांबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण

रोहित कणसे

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं होतं. यानंतर शरद पवार यांनीही आज (२५ ऑगस्ट) सकाळी बारामती येथे बोलताना सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याला दुजोरा दिला होता. दरम्यान साताऱ्यात बोलताना मात्र त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत, मी तसं बोललोच नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार म्हणाले की, पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी मागायची नसते आणि मागीतली तर ती द्यायची नसते. सध्या आमची भूमिका दुसरी आहे. आमचे नेते असं मी म्हणालो नाही. सुप्रिया अजित पवारांना नेते म्हणाली. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. त्याच्यामुळे बहिण भावांच्या नात्यात बोललेल्या गोष्टीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे नेते नाहीत असेही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय झालं होतं?

सुप्रिया सुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे आमचेच नेते आहेत, असं म्हणतात असा प्रश्न शरद पवारांना बारामती येथे विचारण्यात आला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की- आहेतच, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, आज तशी स्थिती येथे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये तोत्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचं काही कारण नाही हा त्यांचा निर्णय आहे असे शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT