Sharad Pawar-CM Uddhav Thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर बैठक, नेमकी काय झाली चर्चा?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची दोन दिवसांपूर्वीच भेट घेतली होती. आज पुन्हा पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी दोघांमध्येही अर्धा तास बैठक झाली असून यामध्ये विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबाबत त्यांची भूमिका वारंवार बोलून दाखविली होती. त्यानतंर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दसरा मेळाव्यात ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग या तपास यंत्रणांवर सडकून टीका केली होती. तसेच भाजपचा देखील चांगलाच समाचार घेतला होता. महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांमागे सध्या ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यामध्ये शिवसेनेच्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तसेच भाजपचे नेते किरीट सोमय्या दररोज कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे. त्यामुळे या चौकशांना उत्तर द्यायला पाहिजे, या उद्देशाने महाविकास आघाडी सरकार आपली व्युव्हरचना तयार केली जात असल्याची माहिती आहे. यासंबंधितच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दोन दिवसांपूर्वीही घेतली होती भेट -

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली होती. यामध्ये अवजड वाहनांवरील वाहतूक कर माफ अथवा कमी करणे, कोरोनामुळे आणि डिझेल महागाईमुळे अडचणीत असलेल्या वाहतूकदारांना दिलासा देणे. तसेच महामार्गावरील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT