Sharad pawar vs Ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Breaking : NCPच्या शरद पवार गटाला उत्तर सादर करण्यासाठी मुदतवाढ; आता ८ सप्टेंबरपर्यंत...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट उद्या निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाने उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला होता. आता निवडणूक आयोगाने ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या गटाने कोणती कागदपत्र दिली आहेत, त्यांची यादी द्या म्हणजे त्यावर आम्हाला उत्तर देता येईल असा मेल शरद पवार गटाने केला होता. पण त्याला निवडणूक आयोगाकडून कुठलंही उत्तर आलं नव्हते. त्यानंतर शरद पवार गटाने पुन्हा 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला होता.

दरम्यान निवडणूक आयोगाने उत्तर दाखल करण्यासाठी शरद पवार गटाला ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला दिलासा मिळाला आहे.

निवडणूक आयोगाने (उद्या) गुरुवारपर्यंत दोन्ही गटांना उत्तर सादर करायची मुदत दिलेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT