Jayant Patil_Saroj Patil 
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: सरोज पाटलांच्या इच्छेवर जयंत पाटलांचं भाष्य; म्हणाले, अध्यक्षपदासाठी माझं नाव...

जयंत पाटील अध्यक्ष व्हावेत अशी भावना शरद पवारांच्या बहिण सरोज पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शरद पवारांच्या बहिण सरोज पाटील यांनी जयंत पाटील हे उच्चशिक्षित आहेत त्यामुळं त्यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्ष व्हावं अशी भावना व्यक्त केली आहे. यावर खुद्द जयंत पाटलांनी भाष्य केलं आहे. त्यांनी माझं नाव घेतलं असलं तरी मी महाराष्ट्रात काम करतोय, असं सांगताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (NCP Sharad Pawar resigns Jayant Patil Comment on Saroj Patil statement)

जयंत पाटील म्हणाले, "माईंनी अर्थात सरोज पाटील ज्या दिवंगत एनडी पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांनी माझं नाव जरी घेतलेलं असलं तरी मी महाराष्ट्रात काम करतो आहे. महाराष्ट्र सोडून दिल्लीची जबाबदारी घ्यायची म्हटलं तर दुसऱ्या राज्यात माझ्या ओळखीही नाहीत. माझा संपर्कही दुसऱ्या राज्यांत नाही. त्यामुळं दिल्लीत बसणाऱ्या, लोकसभेत-राज्यसभेत काम करणाऱ्या आणि देश काही वर्षे संसदेत बसून बघणाऱ्या व्यक्तीनं अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. पवारांना तो अनुभव आहे, त्यामुळं ते यशस्वीपणानं देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम केलं आहे. आज अनेक वर्षांचा पवारांना अनुभव असल्यानं त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. विविध राज्यातील लोक त्यांच्या विश्वासापोटी या पक्षात आले आहेत"

पवार त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. पण पक्ष पुढे नेण्यासाठी काहीतरी पावलं टाकली पाहिजेत अशी त्यांची भूमिका दिसते आहे. मी प्रदेशाध्यक्ष असल्यानं आमच्या सहकार्यांना सर्वात जास्त काळजी २०२४ च्या विधानसभा निवडणुकांपर्यंतची आहे. त्यामुळं २०२४ च्या विधानसभा-लोकसभा निवडणुका होईपर्यंत अध्यक्ष राहिले तर पक्षातील सर्व घटकांना ते न्याय देतील. आम्ही राज्य स्तरावर जर कोणावर अन्याय करत असू तर ती व्यक्ती त्यांच्याकडं जाऊन आपलं गाऱ्हाणं सांगू शकते, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT