Jayant Patil News esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : शिंदे गटात गेलेल्या आमदारांना पश्चाताप; NCP च्या प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट

'त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत.'

सकाळ डिजिटल टीम

'त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत.'

Jayant Patil News : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडीविरुध्द शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) असा 'सामना' रंगताना दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीय. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले, त्यांनी काही ना काही उद्देश व लाभ ठरवून गेले आहेत, हे जनतेच्या लक्षात आलं आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळं पुढच्या काळात चित्र वेगळं असेल, असं विधान जयंत पाटील यांनी केलंय. जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची पावसामुळं झालेली प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारनं जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होतं. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचं दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका पाटील यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नामोहरम करणं आणि त्यांना अडचणीत आणणं असा उद्योग काही लोक करत आहेत. परंतु, त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत, असंही पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रेकिंगला जाते सांगून लोणावळ्याला गेली; मुंबईत LLB करणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा ४०० फूट खोल दरीत आढळला मृतदेह

Pune News: पुणे बनणार संरक्षण अर्थकारणाचे संशोधन हब: जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, सांगवीत ‘एनएडीएफएम’च्या संकुलाची उभारणी!

Latest Marathi News Live Update : भारतावरील आयातशुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के करणार; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Pune News: टायगर पॉइंट दरीत आढळला तरुणीचा मृतदेह; नवी मुंबईच्या श्रेया पती यांचा मृत्यू, लोणावळ्यात नेमकं काय घडलं!

Ajit Pawar Plane Crash : विमान अपघातानंतर अजित पवार यांची ओळख घड्याळामुळे नव्हे तर दुसऱ्या कारणामुळे पटली; पोलिस सुत्रांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT