Supriya Sule amol mitkari 
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: 'ताईंच्या वक्तव्याचं समर्थन करतो, पण..'; अमोल मिटकरींनी सुप्रिया सुळेंना स्पष्टच सांगितलं

कार्तिक पुजारी

मुंबई- बहिणीचं कल्याण बघेल, असा भाऊ प्रत्येक घरात नसतो, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्या लोकसभेत बोलत होत्या. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेले आपले भाऊ अजित पवार यांना टोला लगावल्याची चर्चा आहे. यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया ताईंच्या वक्तव्याचं मी समर्थन करतो. प्रत्येक घरात बहिणीचं रक्षण करणारा भाऊ नसतो. पण ताई त्याला अपवाद आहेत.अजित पवार सारखे भाऊ त्यांच्या मागे खंबीर आहेत.शरद पवार यांच्यानंतर बारामती मतदारसंघात अजित पवार हे पाठिशी राहिले. त्याबाबत सुप्रिया ताई भाग्यवान आहेत, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

महिलांबाबत महिलांनीच बोलावं, असं काही नसतं भाऊ देखील बहिणीची काळजी करत असतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, 'अमित शहा बोलले पण प्रत्येक घरात असे भाऊ असतातच असे नाही, जे बहिणीचं कल्याण बघतील. प्रत्येक बहीण इतकी नशीबवान नसते.'

महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा देखील उल्लेख केला होता. आज महिला आरक्षणावर चर्चा सुरु आहे पण महाराष्ट्र भाजपचे माजी अध्यक्ष यांनी मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला होता. यावर भाजपने उत्तर द्यायला हवे. भाजपचे लोक महिलांवर वैयक्तिक टीका करतात, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं होतं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT