NCP Supriya Sule tweet on Abdul sattar abuse controversy Maharashtra politics
NCP Supriya Sule tweet on Abdul sattar abuse controversy Maharashtra politics  sakal
महाराष्ट्र

Abdul Sattar Controversy: सत्तारांच्या वादग्रस्त टीकेवर 'जय हिंद जय महाराष्ट्र' करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवी दिल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर सत्तार यांच्यावर सर्व सरांमधून टीका केली जात होती. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी यावर त्याचवेळी प्रतिक्रिया देणे टाळले होते. दरम्यान आज मंगळवारी सुळे यांनी ट्विट करत या संपुर्ण प्रकारावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांच्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात."

"परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे."

पुढे त्यांनी म्हटले आहे की, "मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया."

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या समर्थनात पुढे आलेल्या सर्वांचे आभार देखील मानले आहेत, त्या म्हणाल्या की, "याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा 'सुसंस्कृतच महाराष्ट्र' आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र!"

झालं काय होतं?

शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांनी खोके देण्याची ऑफर केली होती, यावर बोलताना सुप्रिया सुळे या तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असे म्हटले होते. यावर प्रश्न विचारला असता सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं. त्यांच्या या विधानानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT