Supriya Sule  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: सुप्रिया सुळे विदर्भातील 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक; म्हणाल्या...

याच मतदारसंघातून भाजपचा दिग्गज नेता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची देखील चर्चा आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. पण आता त्यांनी विदर्भातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण याच मतदारसंघातून भाजपकडून आपल्या एका दिग्गज नेत्याला उमेदवारी देण्याबाबत विचार सुरु असल्याची चर्चा आहे. (Supriya Sule willing to contest from Wardha constituency in Vidarbha)

सुप्रिया सुळे सध्या वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी काल गांधी जयंती निमित्त त्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली, त्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण वर्ध्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. सुळे सध्या बारामतीतून तिसऱ्यांदा खासदार आहेत. सन २००६ मध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या. (Latest Marathi News)

...तर आनंदच - सुळे

सुळे म्हणाल्या, "मला असं वाटतं की वर्धा हा खूपच पवित्र असा जिल्हा आहे. विनोबाजी आणि महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. त्यामुळं या दोघांच्या पवित्र भूमीत जर आपल्याला काम करण्याची संधी मिळाली तर मला आनंदच आहे. पण अर्थातच संघटना याबाबत ठरवेल तेव्हाच हे शक्य होऊ शकेल" (Marathi Tajya Batmya)

बावनकुळेंना संधी देणार

दरम्यान, सध्या वर्धा मतदारसंघातून भाजपचे रामदास तडस हे विद्यमान खासदार आहेत. पण या जागेवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा विचार भाजपकडून सुरु असल्याचीही चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: रेल्वेच्या अभियंत्यांना दिलासा! मुंब्रा लोकल अपघात प्रकरणी अटक केली जाणार नाही

BMC Election: मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही! भाजप नेत्याच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय संताप

Malegaon Municipal Election : बोटावरची शाई आता इतिहासजमा! मालेगाव महापालिका निवडणुकीत वापरले जाणार १५०० मार्कर पेन

बाबो! पुण्याच्या रस्त्यावर धावली दुबईची ‘Polaris Slingshot R’, कार पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी, viral video

Latest Marathi News Live Update : सटाण्यातून SBIचं एटीएम चोरीला

SCROLL FOR NEXT